नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे फायदे..
Benefits Of Colourful Navratri 2022..
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो.
हे दिवस शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ म्हणून मानले जातात.या दिवसांत आपल्याला नवीन उत्साह, बळ, आरोग्य, मानसिक आणि बौद्धिक
विकास होतो.
या नऊ दिवसांत नऊ रंगांचे विशेष महत्त्व आहे.
नऊ रंगांचे कपडे घालण्याची मज्जा तर औरच असते.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला आहे.
चला तर मग..
यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवातील नऊ रंग आणि त्यांचे विशेष महत्व
जाणून घेऊया..
त्याच बरोबर कोणत्या राशी आणि लग्नाच्या व्यक्तीला फायदेशीर ठरेल तेही पाहूया की..
* पहिला दिवस.. (26 सप्टेंबर 2022)
रंग - पांढरा (सफेद)
पांढरा रंग हा स्वच्छता, शुद्धता, पवित्रता, आणि शांततेचा प्रतीक आहे.
हा रंग कोमलता, पारदर्शकता, सुरक्षितता, निरागसता, साधेपणा आणि सात्विकता देतो.
कर्क, वृश्चिक, मीन या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* दुसरा दिवस.. (27 सप्टेंबर 2022)
रंग - लाल
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
हा रंग शक्ती, चैतन्य, शौर्य आणि धैर्य देतो.
मेष, सिंह, वृश्चिक, धनु या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* तिसरा दिवस.. (28 सप्टेंबर 2022)
रंग - गडद निळा (शाही निळा)
गडद निळा रंग हा प्रसन्नता, शांतता, स्थिरता, आनंद आणि समृद्धीचा प्रतीक आहे.
हा रंग शांत - विश्रांत स्थितीचा अनुभव देतो.
मकर, कुंभ, कन्या, तूळ, वृषभ, मिथुन या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* चौथा दिवस.. (29 सप्टेंबर 2022)
रंग - पिवळा
पिवळा रंग हा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा प्रतीक आहे.
हा रंग उष्णता, प्रसन्नता आणि बौद्धिक विकास वृद्धी देतो.
धनु, मीन, सिंह, मेष या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* पाचवा दिवस.. (30 सप्टेंबर 2022)
रंग - हिरवा
हिरवा रंग हा शीतलता, शुभ्रता आणि सौभाग्याचा प्रतीक आहे.
हा रंग प्रगती, भरभराट, समृद्धी, सुसंवाद, चैतन्य, स्थिरता आणि जीवनातील नवीन सुरुवात करून देतो.
मिथुन, कन्या, वृषभ, तूळ, मकर, कुंभ या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* सहावा दिवस.. (01 ऑक्टोबर 2022)
रंग - करडा (राखाडी)
राखाडी रंग हा स्थिरतेचा, शिस्तबद्धतेचा, कौशल्याचा आणि सुरक्षिततेचा प्रतीक आहे.
हा रंग व्यक्तीला व्यवहारिक, साधे राहण्यासाठी आणि संतुलित विचारसरणी देतो.
वृषभ, तूळ, कन्या, मिथुन, मकर, कुंभ या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* सातवा दिवस.. (02 ऑक्टोबर 2022)
रंग - भगवा (केशरी)
भगवा रंग हा पराक्रम, धैर्य, बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे.
हा रंग साहस, शक्ती, मन आनंदी ठेवतो आणि आनंदाची भावना देतो.
सिंह, धनु, मेष या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* आठवा दिवस.. (03 ऑक्टोबर 2022)
रंग - मोरपंखी हिरवा
मोरपंखी रंग हा संपन्नता, स्थैर्यता, विशिष्टता आणि व्यक्तिमत्वाचा प्रतीक आहे.
हा रंग विश्वास, एकनिष्टता, आत्मविश्वास, सचोटी, सृजनता, आरोग्यसंपन्नता आणि नावीन्य देतो.
मिथुन, कन्या, वृषभ, तूळ, मकर, कुंभ या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
* नववा दिवस.. (04 ऑक्टोबर 2022)
रंग - गुलाबी
गुलाबी रंग हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, भावनेचा आणि सृजनतेचा प्रतीक आहे.
हा रंग आपुलकी आणि व्यक्तिमत्वात आकर्षकता देतो.
वृषभ, तूळ, कन्या, मिथुन, मकर, कुंभ या राशी आणि लग्नाच्या लोकांना फायदेशीर..
वरील सर्व माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट्स करून सांगा..
अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनल, इंंस्टाग्राम आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या.निरंजन पंडित..
सोन स्वरुप जेम्स अँड ज्वेलरी.
WhatsApp : +91 86919 23333
#सोनस्वरूप #सोनस्वरूपजेम्सअँडज्वेलरी #sonswaroopgemsandjewellery #sonswaroop #sonswarup #navratri #colours #navratricolours #color #colorful #colourful #नवरात्र #नवरात्री #कलर #रंग #कलर्स #navratra #navratri2022 #colour #शारदीय #नऊ #रात्र #दुर्गा #durga #DurgaPuja #DurgaPuja2022 #durgamaa #ShardiyaNavratri2022 #shardiyanavratri #festival

Comments
Post a Comment