मेष राशी..
तुमची राशी उष्ण प्रकृतीची आहे. जीवनातील थेट भिडणाऱ्या गोष्टी आपणांस आवडतात. रागीट, शीघ्रकोपी स्वभावामुळे त्रास होऊ शकतो. प्रवासाची आवड असणारे, धार्मिक स्वभावाचे देव धर्मासाठी भांडणारे आहात.
कोणतेही कार्य करताना मागचा पुढचा विचार न करता करण्याची सवय तुम्हाला महाग पडू शकते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना निर्भयपणे सामोरे जाता. स्वतंत्रता,उदारता, उत्साह, आशावाद, साहसी स्वभाव आणि धैर्य हे तुमचे चांगले गुण आहेत.
काटक, उतावळा, बुद्धी कमी, महत्वाकांक्षा मोठी, एकांतप्रिय, आदर्शवादी आहात. वरिष्ठांशी विनयशील तर इतरांशी फटकून वागता. क्षणिक चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. हट्टी, जिद्दी इतरांचे न ऐकता स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करता.
थोडे मूडी आहात. मूड बदलला तर समोरच्याचा विचार करत नाहीत. नेतृत्व करण्याची आवड असल्यामुळे अधिकारी पद मिळविण्यासाठी खटपट करता आणि ते मिळवता सुद्धा. दुसऱ्याने जे केले तसेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करता आणि फसता. चुकीच्या ठिकाणी लवकर विश्वास ठेवता.
खेळाडू वृत्ती आहे. तंत्रज्ञानाबाबत आपण कुशल आहात. आपले लक्ष साधण्याची चपळाई आपणामध्ये आहे. शांत राहून सामंजस्याने वागलात तर आयुष्य खूप सुंदर .
शुभ राशी – कर्क,सिंह,वृश्चिक, धनु,मीन.
शत्रू राशी – मिथुन,कन्या,मकर,कुंभ.
शुभ रंग – लाल,भगवा,पिवळा,चंदेरी,सोनेरी,सफेद.
राशी रत्न – पोवळे
शुभ रत्न – माणिक
भाग्य रत्न – पुष्कराज देवता..
राशी देवता – मंगळ, गणपती, हनुमान
भाग्य देवता – गुरू, दत्तगुरु,साईबाबा,स्वामी समर्थ
शुभ देवता – सूर्य
उपाय..
1) मंदिरात जाऊन गणपतीला दुर्वा-जास्वंदी व मसुरीची डाळ वाहणे. !! ॐ अं अंगारकाय नमः !! मंत्र रोज सकाळी 21 किंवा 108 वेळा बोलणे.
2) रोज सकाळी सूर्याला अर्ध्य देत !! ॐ ह्रिम सुर्याय नमः !! मंत्र 21 किंवा 108 वेळा बोलणे.
3) दत्तगुरूंच्या मंदिरात दर गुरुवारी चण्याची डाळ, गूळ, पिवळी फुले वाहणे आणि !! ॐ बृम बृहस्पतये नमः !! मंत्र 21 किंवा 108 वेळा बोलणे.
4) हनुमंताच्या मंदिरात बत्तासे अर्पण करावेत.
व्हिडीओसाठी लिंक वर क्लिक करा..
वर दिलेल्या माहिती मध्ये..
मेष राशीचा स्वभाव आणि गुणधर्म हे फक्त मेष राशीला अनुसरून (ढोबळमानाने) आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे ह्या फलादेशात थोडाफार फरक येऊ शकतो.
तुमच्या कुंडली प्रमाणे म्हणजेच तुमची जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाणावरून तुमचे भविष्य बदलू शकते.
तुम्हाला तुमच्या राशी बद्दल किंवा कुंडली बद्दल मोफत जाणून घ्यायचे असेल तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या. आमचे तज्ञ ज्योतिषी तुमच्या सर्व शंकांचे निराकरण योग्य ते मार्गदर्शन देऊन करतील.
सोन स्वरुप मध्ये सर्व रत्ने प्रमाणपत्रांसहित अंगठी किंवा पेंडंट.. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम, त्रिधातू, पंचधातू, अष्टधातू, मध्ये बनवून शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी करून मिळतील.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट, फेसबुक, युट्यूब चॅनल आणि इंंस्टाग्रामला अवश्य भेट द्या.
निरंजन पंडित.. सोन स्वरुप जेम्स अँड ज्वेलरी.
WhatsApp : +918691923333

Comments
Post a Comment