1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल.. (मराठी भाग - 3 )
1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल.. (मराठी भाग - 3 )
गरम पाण्यामुळे 1 ग्रामचे दागिने खराब होतात.
एक ग्राम चे दागिने तांबे या धातू वर प्रक्रिया करून बनविले जातात.
गरम पाण्यामुळे तांबे सुद्धा गरम होते आणि कार्बन पकडून दागिने काळे पडतात. तसेच काही ठिकाणची चमक आणि सोन्याचा थर निघून जातो.
थंड पाण्याने सुद्धा आंघोळ करताना दागिने वापरले तर साबणात ऍसिड असल्यामुळे साबणाच्या वापरामुळे दागिने काळे पडतात.
अंगाच्या साबनापेक्षा कपड्याच्या आणि भांड्यांच्या साबणात जास्त प्रमाणात अॅसिड वापरले जाते.
त्यामुळे कपडे आणि भांडी धुताना सुद्धा साबणाच्या संपर्कात दागिने आल्यामुळे ते काळे पडतात.
दागिन्यांवर ज्या ठिकाणी साबण लागून राहिला असेल त्या ठिकाणी दागिना खूपच जास्त प्रमाणात काळा पडतो.
अॅसिड च्या संपर्कात जर एक ग्राम चे दागिने आले तर ऍसिडमुळे दागिने पूर्णपणे खराब होतात.
म्हणून...
* अंघोळ करताना, कपडे धुताना, भांडी घासताना दागिने काढून ठेवा.
* गरम पाणी आणि अॅसिड पासून दागिने लांब ठेवा.
https://www.instagram.com/p/CPIpWSrpdkw/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Comments
Post a Comment